ताज्या घडामोडी :
Home » » नगरसूल येथे झालेल्या हाणामारीत बाळू पैठणकर यांचा मृत्यू

नगरसूल येथे झालेल्या हाणामारीत बाळू पैठणकर यांचा मृत्यू

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ११ एप्रिल, २०११ | सोमवार, एप्रिल ११, २०११

येवला तालुक्यातील नगरसूल येथे किरकोळ कारणावरून आज दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीत बाळू पैठणकर यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. खुनाप्रकरणी तिघांना येवला तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.


धनामाळी मळा येथील बाळू रावजी पैठणकर यांच्या घरासमोर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांचे भाऊबंद असलेल्या तुळशीराम लक्ष्मण पैठणकर यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातून लाठ्याकाठ्या व गजांनी केलेल्या मारहाणीत बाळू (५५) व त्यांचा मुलगा अनिल (३०) हे गंभीर जखमी झाले. नगरसूल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी चार वाजता बाळू यांचा मृत्यू झाला तर अनिलची प्रकृती चिंताजनक आहे. आशाबाई बाळू पैठणकर यांच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात तुळशीराम पैठणकर, त्यांचे भाऊ कैलास, शरद व पत्नी सुनीता यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity