मनमाडपासून जवळच झालेल्या रस्ता अपघातात येवल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे जागीच ठार झाले आहेत. मनमाडपासून जवळच असलेल्या बुंदलगाव शिवारात मनमाडहून मालेगावकडे जात असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीला समोरून भरधाव वेगात येत असलेल्या 407 टेम्पो गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येवला पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रवींद्र ग. पाटील हे जागीच ठार झाले. पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून, चार दिवसांपूर्वीच व येवला पोलीस ठाण्यात बदलून आले होते. ड्यूटी आटोपून आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी जात असताना कुंदलगाव शिवारात झालेल्या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ते २४ दिवसापुर्वीच येवल्याला बदलून आले होते.
Home »
» येवल्याचे एपीआय रविंद्र पाटील यांचा अपघाती मृत्यू
येवल्याचे एपीआय रविंद्र पाटील यांचा अपघाती मृत्यू
Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३० मे, २०११ | सोमवार, मे ३०, २०११