ताज्या घडामोडी :

.

.
Home » » जलतरण तलावाला थेट पाणीपुरवठा देण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न शिवसेना—भाजपाच्या नगरसेवकांनी हाणून पाडला

जलतरण तलावाला थेट पाणीपुरवठा देण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न शिवसेना—भाजपाच्या नगरसेवकांनी हाणून पाडला

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ जून, २०११ | बुधवार, जून १५, २०११

येवला शहरात आजही दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना व अपुर्‍या दाबाने पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी कायम असताना शहरातील जलतरण तलावाला थेट पाणीपुरवठा देण्याचा सत्ताधारी गटाचा प्रयत्न आज शिवसेना—भाजपाच्या नगरसेवकांनी हाणून पाडला. येवला नगरपालिकेची सर्वसाधारण सभा जलतरण तलावाला 24 तास पाणीपुरवठा देण्याच्या विषयांवरून चांगलीच गाजली, तर इतर 19 विषयांना मात्र मंजुरी मिळाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. जयाबाई जाधव होत्या. सर्वसाधारण सभेत विंचूररोड येथे झालेल्या नाट्यगृहास महात्मा जोतिराव फुले यांचे नाव देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. विषय पटलावरील विषय सभागृहात उपस्थित सर्वपक्षीय नगरसेवकांनी खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करताना क्रीडा संकुलातील जलतरण तलावास वैजापूररोडवरील जलकुंभातून थेट जोडणी देऊन 24 तास पाणी देण्यासाठीचा विषय वादळी ठरला. सदर विषय चर्चेला येताच शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र लोणारी यांनी मुख्याधिकार्‍यांना यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले. भाजपा नगरसेवक प्रमोद सस्कर, सौ. छाया क्षीरसागर यांनीही त्यास सहमती दर्शवित स्वाक्षरी केली. वैजापूररोड जलकुंभावरून हुडको वसाहत, गंगादरवाजा परिसर, स्टेशनरोड, एनडीसीसी बँक कॉलनी, लोणारीनगर आदि असंख्य कॉलन्यांना पाणीपुरवठा केला जातो. या विविध भागांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. अशात भविष्याचा विचार करून जलतरण तलावाला थेट पाणीपुरवठा करणे योग्य नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरता का असा सवाल करीत सेना-भाजपा नगरसेवकांनी मुद्दा उचलून धरला. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता अन् बहुमत असूनही युती नगरसेवकांनी उठविलेल्या आवाजाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही बॅकफुटवर जाणे पसंत केले. मोठय़ा चर्चेनंतर हा विषय सर्व माहिती घेऊन पुढील सभेच्या पटलावर ठेवावा, अशी सूचना करीत राष्ट्रवादी नगरसेवकांनी तो पुढे ढकलला
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity