ताज्या घडामोडी :
Home » » येवल्याजवळ ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू

येवल्याजवळ ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २९ जून, २०११ | बुधवार, जून २९, २०११

येवल्याजवळ ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये आज (बुधवार) दुपारी झालेल्या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
येवल्याजवळ 6 किलोमीटर अंतरावर येवला कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल शिवारात म्हसोबा मंदिरानजिक ट्रक व मिनिडोर मध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातात दहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले कोपरगाव व येवला येथील रहिवासी आहेत. अन्य नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना शिर्डी व नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल आहेत.

मृत्युमुखी पडलेल्यांची नावे - 
हिरामण दगडू काटकर (वय ४५, रा. कोपरगाव), संगीता श्रीकांत गायके (वय ४०, रा. कोपरगाव), उषा रमेश कुमावत (वय ५० रा. चाळीसगाव), प्रियांका शिंदे (वय २६) व त्यांची मुलगी श्रद्धा शिंदे (वय ४), अन्य चार मृतांची ओळख पटलेली नाही.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे -
राहुल निकम, कैलास वाघ, अनिल सोनवणे, महेंद्र हेगडयाल, रमेश कुमावत, योगिता गायके इतर जखमींची नावे समजू शकलेली नाही

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity