ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला शहर पाणीपुरवठा संकटात...............

येवला शहर पाणीपुरवठा संकटात...............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ६ जुलै, २०११ | बुधवार, जुलै ०६, २०११


येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाचा पाणीसाठा फार कमी राहीलेला असून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ मिनीटे कपात केलेली आहे.  पाऊस नसल्याने धरणात सुध्दा पाण्याचा साठा अल्प असल्याने येवले शहरावर पाण्याचे संकट लवकरच कोसळण्याच्या बेतात आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे. आता धरणावर पाऊस झाल्याशिवाय या परिस्थितीत फरक पडणार नाही असे दिसून येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात सोळा दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराला तीस ते पस्तीस दिवस पुरणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे पालिकेने शिल्लक पाणीसाठा जास्त कालावधीपर्यंत पुरेल या बेताने नियोजन केले आहे त्याचप्रमाणे सात ते आठ दिवसांत पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे. नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे. ज्या नळकनेक्‍शन धारकांनी नळाला कॉक बसविलेले नसतील त्यांचे कनेक्‍शन बंद करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नळजोडणीचे पाणी बांधकामकरिता वापरताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई पालिका करणार आहे. सध्या पाऊस न झाल्यामुळे व साठवण तलावातील पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्‍यक असल्याने पाणीकपात करण्यात आल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, पाणीपुरवठाप्रमुख भालचंद्र कुक्कर यांनी सांगितले.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity