ताज्या घडामोडी :
Home » » येवला पटेल कॉलनीमध्ये घरफोडीत तीन लाख रुपयांची चोरी

येवला पटेल कॉलनीमध्ये घरफोडीत तीन लाख रुपयांची चोरी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ७ जुलै, २०११ | गुरुवार, जुलै ०७, २०११

येवला शहरातील पटेल कॉलनीत असलेल्या दतानगर भागामध्ये चोरट्यांनी गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री केलेल्या घरफोडीत रोख ३ लाख १४ हजार रुपये चोरले आहेत.
येथील गरेज व्यावसायीक जितेंद्र बोरस्ते हे काल रात्री शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यसाठी गेले होते. चोरट्यांनी संधीचा फायदा घेत रात्री घर फोडले. घरात बोरस्ते यांची आजी झोपलेल्या होत्या. चोरट्यांनी कपाट तोडून आत असलेली रोख रक्कम पळविली. बोरस्ते हे गेल्या ३ वर्षापासून गॅरेज व्यवसायातून मिळालेले पैसे गाळा घेण्यासाठी जमवून ठेवत होते. 
दरम्यान, चोरट्यांनी शेजारील दिनेश भंडारी यांचेही बंद घराचे कुलूप तोडले. घरातील सर्व वस्तू उचुकून सापडलेले १ हजार रुपयेही पळविले. मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पवार, पोलीस निरीक्षक श्रावण सोनवणे यांनी आज (गुरुवार) भेट देवून माहिती घेतली.



Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity