ताज्या घडामोडी :
Home » » स्पिक एशिया वरील रिझर्व्ह बँकेचे बंधने हटवण्यासाठी तहसिलदारांना निवेदन

स्पिक एशिया वरील रिझर्व्ह बँकेचे बंधने हटवण्यासाठी तहसिलदारांना निवेदन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११ | गुरुवार, ऑगस्ट ११, २०११

स्पिक एशिया या सर्व्हे कंपनीचे काम येवल्यातील अनेक जण करतात. यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. नुकत्याच येणाऱ्या काही उलटसुलट बातम्या आणि स्टार न्यूज ने केलेल्या बातमीमुळे या कंपनीची चौकशी चालु आहे. या चौकशीसाठी या कंपनीची खाती सिल केल्याचे समजते. त्यामुळे या कंपनीत पैसे गुंतलेले अनेक स्पिक एशियन त्रस्त झाले असुन त्यांच्या रोजगाराचे साधन हिरावल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. स्पिक एशियाच्या कार्यपध्दतीबद्दल येवल्यातल्या सभासदाची कोमतीही तक्रार नाही. तसेच त्यामुळे आपल्याला चांगला रोजगार मिळालेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तरी रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधामुळे त्यांचे नुकसान होत आहे . त्याबद्दल येवल्यातल्या स्पिक एशियम नी नुकतेच येवला तहसिलदारांना या संदर्भात निवेदन दिले आहे. तहसिलदारांतर्फे सदरचे निवेदन नायब तहसिलदार शरद घोरपडे यांनी स्विकारले आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity