ताज्या घडामोडी :
Home » » येवला पोलिसांची कामगिरी .......बनावट चोरीचा प्रकार अवघ्या चार तासांत उघड...........सत्य भिषण.........माता निघाली वैरी

येवला पोलिसांची कामगिरी .......बनावट चोरीचा प्रकार अवघ्या चार तासांत उघड...........सत्य भिषण.........माता निघाली वैरी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २ ऑक्टोबर, २०११ | रविवार, ऑक्टोबर ०२, २०११

नवरात्रोत्सवानिमित्त देशभर स्त्रीशक्तीचा जागर घुमत असताना आईनेच आपल्या सव्वा महिन्याच्या बालिकेची हत्या केल्याची घटना येवला -कोपरगाव रोडवरील नव्या तहसील कार्यालयासमोर शनिवारी दुपारी घडली. सुरुवातीला घरात शिरलेल्या चोरट्याने हाती काहीच न लागल्याने मुलीचा खून केल्याचा बनाव आईने केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दुसरीही मुलगीच झाल्याने आईनेच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी आईला अटक करण्यात आली आहे.
नांदगाव तालुक्यातील खिडीर्भवर येथे राहणारी वैशाली अरुण आहिरे ही बाळंतपणासाठी माहेरी येवल्यात आली होती. तिचे वडिल वसंत मोतीराम घोडेराव सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई आहेत. दुपारच्या वेळेत आई वडील व दोन लहान भाऊ बाहेर गेल्यानंतर तिने आपल्या सव्वा महिन्याच्या मुलीची हत्या केली. 

सुरुवातीला चोरट्यांनी लहानग्या मुलीला दगडी पाट्याचा वापर करत ठार मारल्याची बातमी पसरली. याबाबत येवल्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. परंतु काही तासांतच आईने बालिकेला ठार केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांची मने हेलावली. मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समाधान पवार यांच्यासह पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खरा प्रकार अवघ्या चार तासांत उघड केला. 
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity