दि. ११ एप्रिल १८२७ महात्मा जोतिराव फुले यांचा जन्म. स्त्री-शिक्षण, अस्पृश्यांचे शिक्षण, सामाजिक सुधारणा यात त्यांनी मोठे काम केले. महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!!

येवला तालुक्यातील नगरसूल येथे किरकोळ कारणावरून आज दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीत बाळू पैठणकर यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. खुनाप्रकरणी तिघांना येवला तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.


धनामाळी मळा येथील बाळू रावजी पैठणकर यांच्या घरासमोर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांचे भाऊबंद असलेल्या तुळशीराम लक्ष्मण पैठणकर यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातून लाठ्याकाठ्या व गजांनी केलेल्या मारहाणीत बाळू (५५) व त्यांचा मुलगा अनिल (३०) हे गंभीर जखमी झाले. नगरसूल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी चार वाजता बाळू यांचा मृत्यू झाला तर अनिलची प्रकृती चिंताजनक आहे. आशाबाई बाळू पैठणकर यांच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात तुळशीराम पैठणकर, त्यांचे भाऊ कैलास, शरद व पत्नी सुनीता यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

येवला तालुक्यातील राजापूर येथे काल पडलेल्या दरोड्यात केशव भालके यांचा दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झाला असून त्यांच्या पत्मी शोभा ह्या गंभीर जखमी झालेल्या आहेत.  या संदर्भात आलेली दै . सकाळ मधील वृत्त सकाळ मधून आपल्यासाठी साभार..




                                                                            अधिकमाहितीसाठी वाचा..

http://72.78.249.107/Sakal/9Apr2011/Normal/Nashik/index.htm

आणी

http://72.78.249.107/Sakal/9Apr2011/Normal/Nashik/page9.htm

                                                                           

एकूण पृष्ठदृश्ये

अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे. Blogger द्वारा समर्थित.

येवलान्युज.कॉम ला भेट देणारे जगभरातले प्रेक्षक