ताज्या घडामोडी :
Home » » येवला येथील एका प्रतिष्ठीत राजकारण्यासह चौघांना सोन्याच्या आमिषाने सात-आठ जणांच्या टोळीने बेदम मारहाण

येवला येथील एका प्रतिष्ठीत राजकारण्यासह चौघांना सोन्याच्या आमिषाने सात-आठ जणांच्या टोळीने बेदम मारहाण

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २१ मे, २०१२ | सोमवार, मे २१, २०१२

दै.पुण्यनगरीच्या बातमीवर आधारित..............
येवला येथील एका प्रतिष्ठीत राजकारण्यासह चौघांना शनिवारी रात्री स्वस्त सोन्याच्या आमिषाने सात-आठ जणांच्या टोळीने बेदम मारहाण करून तब्बल 5 लाख रुपयाला लुटल्याची घटना घडली आहे.या प्रतिष्ठीतांची नाशिक पासिंगचा नंबर असलेली बोलेरो जीप सोनई पोलिसांना मिळाली आहे. मात्र जीपमधील लोक घटनेनंतर गायब झाले असून त्यांना जबाबासाठी बोलावण्यात आल्याची माहिती सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फुंडकर यांनी दिली.नेवासा फाटा, फत्तेपूर, खडका हा भाग सोनेरी टोळीच्या कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. स्वस्त सोन्याच्या आमिषाने या टोळीने आतापर्यंत नाशिक, मुंबई, पुणे व मराठवाडय़ातील अनेकांना गंडविले आहे. मार खाऊन हे लोक गप्प राहिले. काही जणांनी पोलिसांकडे फिर्यादी दिल्या. बाकी बहुतेक जणांनी प्रतिष्ठा आणि इज्जतीपायी मार खाऊन व जवळचा पैसा आडका जाऊन गप्प राहणे पसंत केले. शनिवारच्या घटनेतील येवल्याचे प्रतिष्ठीतही यातलेच निघाले, पण त्यांची बोलेरो जीप सोनई पोलिसांना सापडल्याने त्यांना आता जबाब द्यावा लागणार आहे. तब्बल 5 लाख रुपयांना हे लोक लुटले गेलेले आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity