ताज्या घडामोडी :
Home » » विंचूर रोडवर सोने चोरणाऱ्या संशयीतास अटक...............

विंचूर रोडवर सोने चोरणाऱ्या संशयीतास अटक...............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२ | सोमवार, नोव्हेंबर २६, २०१२

९ नोव्हेंबर ला येवला शहरातील विंचूर रोडवरून १० तोळेच्या आसपास सोने चोरून मोटार सायकल वरून फरार झालेल्या एका संशयीतास येवला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने बुधवार पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. स्टेच बँकेच्या लॉकरमधुन घरी सोनो घेऊन जाणाऱ्या सुमतीलाल भावसार यांचे सोने मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी पळ काढला होता. या गुन्ह्याच्या तपास करताना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेज तपासले असता एक संशयीत टेहळणी करताना दिसत होता. आपली पिशवी खेचणारा हाच इसम आहे असे भावसार यांनी ओळखले . . पोलिस तपासात तो श्रीरामपूर येथील अट्टल चोर सलिम नूरअली इराणी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पो.नि. श्रावण सोनवणे सपोनि पांडूरंग  खेडकर, ठाकरे यांनी तपास केला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity