ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यात स्वच्छतेचा बोजवारा............

येवल्यात स्वच्छतेचा बोजवारा............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२ | शनिवार, नोव्हेंबर ०३, २०१२

येवला शहरातून महसुलापोटी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर करवसुली करणारी पालिका प्रशासन शहरवासियांना मूलभूत सुविधाही देण्यास अपयशी ठरू लागली आहे. एकीकडे पालिका कर्मचारी वेतनाचा फरक मिळावा यासाठीही प्रशासनाकडे मागणी करीत आहेत. तर शहरातील डेंग्यूची साथ कशी आटोक्यात आणावी हाही प्रश्‍न प्रशासनासमोर ‘आ’ वासून उभा आहे. या कात्रीत प्रशासन सापडले आहे. वाहनचालकांअभावी ३ नव्या घंटागाड्या मुख्याधिकार्‍यांच्या निवासस्थानी पडून असून २ ट्रॅक्टर्स नादुरुस्त अवस्थेत उभे आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.
आज डेंग्यू, मलेरिया, हिवतापाच्या साथीने नागरिक त्रस्त असताना नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हवी आहे ती मूलभूत सुविधा. शुद्ध पाणी, परिसरातील दैनंदिन स्वच्छता, औषधांची फवारणी याची पालिकेकडून अपेक्षा असताना येवल्यात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पालिकेलाच आर्थिक डेंग्यू झाला आहे. मूलभूत सुविधा देण्यास पालिकेकडे पैसाच नाही आहे. त्या कर्मचारी व वाहनांवरही पालिका सुविधा देण्यास असमर्थ ठरू लागली आहे. पालिकेच्या दरबारात एकूण अधिकृत ७ वाहनचालक आहेत. यातील ३ वाहनचालक हे सन २००५-०६ मध्ये न.पा.फंडातून ६ लाख २३ हजार ४४१ रुपयांना घेतलेल्या अग्निशमन बंबावर नियुक्त केलेले आहेत. एक वाहनचालक सन १९८२-८३ मध्ये खरेदी केलेल्या जुन्या अग्निशमन बंबावर आहे. न.पा.फंडातून ३.५० लाख रुपयांना त्यावेळी घेतलेल्या या अग्निशमन बंबावर लाखो रुपयांचा खर्च देखभाल व दुरुस्तीसाठी आजपावेतो पालिकेकडून झाला आहे. हा अग्निशमन बंब फक्त पाण्यावरच असून ‘आमदनी अठ्ठणी खर्चा रुपया’ अशी गत त्याची आहे. एक वाहनचालक नगराध्यक्ष व पालिका मुख्याधिकार्‍यांच्या वाहनावर सेवा देण्यासाठी तत्पर असतो. यामुळे नागरिकांना सुविधा देणार्‍या ट्रॅक्टर व ५ घंटागाड्यांसाठी केवळ २ वाहनचालकच उपलब्ध असतात. वाहनचालकांअभावी घनकचरा व्यवस्थापना अंतर्गातील निधीतून घेतलेल्या ३ घंटागाड्यांपैकी २ घंटागाड्या पालिका मुख्याधिकार्‍यांच्या निवासस्थानी खरेदी घेतल्याच्या दिवसापासून पडून आहेत. यातील आलटून-पालटून घंटागाडी वापरली जाते. मात्र घंटागाड्या उभ्या राहण्याची संख्या दररोज तेवढीच असते. घंटागाड्यांमध्ये २ लाख ७५ हजार २०० रुपयांना एक याप्रमाणे ३ ऍपेरिक्षा व ७ लाख २४ हजार ७८६ रुपयांना एक याप्रमाणे २ रोडस्टार सन २००९-१० मध्ये खरेदी करण्यात आल्या. परंतु शहरातील कचरा वाहण्याचा उद्देश या घंटागाड्यांकडून मात्र सफल झाला नाही.
शहरात डेंग्यूची साथ पसरलेली असताना सन २००७ मध्ये पालिकेने न.पा.फंडातून घेतलेल्या २२ हजारांच्या औषध फवारणीसाठी स्वतंत्र ट्रॅक्टरही नाही अन् वाहनचालकही गेल्या १५ दिवसांसाठी राष्ट्रवादीचे गटनेते प्रदीप सोनवणेंसाठी घरचा ट्रॅक्टर औषध फवारणीसाठी दिला. मात्र ही औषध फवारणीही विशिष्ट भागातच नगरसेवकांनी करून घेतल्याने शहरवासियांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity