ताज्या घडामोडी :

.

.
Home » » शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन

शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेचे आयोजन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१२ | बुधवार, नोव्हेंबर १४, २०१२

दीपावली म्हणजे दीपोत्सव. सर्वांचेच जीवन प्रकाशाने उजळविणारी अन् तेजोमय करणारी. दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण. वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव सर्वचजण प्रकाशाने जणू काही उजळून टाकतात. आकर्षक आकाश कंदिल, फटाक्यांच्या आतषबाजीने अन् लखलखत्या पणत्या जणू काही स्वर्गच जमिनीवर अवतरला की काय असा क्षणभर आभास होतो. आज शहरातील स्वयंसेवी संस्था खटपट युवामंच व नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पणती’ सजावट स्पर्धेने संत नामदेव समाज मंदिरात लखलखत्या पणत्या पाहून येवलेकर भारावून गेले.
सालाबादप्रमाणे यंदाही खटपट युवा मंचने ‘पणती सजावट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. २० महिला व युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. आपापल्या घरून पणत्यांना आकर्षक पद्धतीने सजवून स्पर्धेसाठी आणल्या होत्या. समाज मंदिरात प्रत्येक स्पर्धक महिलेने आपापली आकर्षक सजावट केलेल्या पणतीभोवती रांगोळ्या काढून देखणेपण आणले होते. पणत्यांभोवती केलेली सजावट महिलांचे कलागुण प्रदर्शित करीत होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके व डी. बी. जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. खटपट युवा मंचचे अध्यक्ष मुकेश लचके, कार्यवाह प्रा. दत्ता नागडेकर, नंदकिशोर भांबारे, रामा तुपसाखरे, रमाकांत खंदारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खटपट मंचने यावर्षीही पणती सजावट स्पर्धा घेवून महिलांच्या कलागुणांना वाव दिला. आम्ही घरून पणती सजावट करून आणल्या. रांगोळ्या काढल्या, सजावट केली. सजावट केलेल्या सर्वच स्पर्धक महिलांच्या पणत्या आकर्षित करणार्‍या होत्या.
- माधुरी माळणकर, महिला स्पर्धक
वसुबारसनिमित्त दरवर्षी पणती सजावट स्पर्धा घेतो. महिलांच्या कलागुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळतो. महिलांबरोबर युवतीही सहभागी होतात.
- मुकेश लचके, संस्थापक, खटपट युवा मंच
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity