ताज्या घडामोडी :
Home » » चोरट्यांचा धुमाकुळ ....डिक्कीतून तीन लाख पळविले

चोरट्यांचा धुमाकुळ ....डिक्कीतून तीन लाख पळविले

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२ | मंगळवार, डिसेंबर ११, २०१२

येवला-वैजापूर राज्य महामार्गावर कोटमगाव रेल्वे गेटजवळ दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना नुकतीच घडली. प्राथमिक शिक्षक साहेबराव भागवत रा. गवंडगाव, ता. येवला यांनी गंगा दरवाजावरील बँक ऑफ इंडिया शाखेतून तीन लाख रुपये काढले. सदर पैसे कापडी पिशवीत गुंडाळून भागवत यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. ते आपल्या घराकडे जात असताना कोटमगाव रेल्वे चौकी बंद असल्याने भागवत तेथे थांबले. दुचाकीच्या डिक्कीतून पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पैसे घेऊन येवल्याच्या दिशेने पळ काढला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity