ताज्या घडामोडी :
Home » » येवला तालुका विज्ञान प्रदर्शनाची नुकतीच सांगता

येवला तालुका विज्ञान प्रदर्शनाची नुकतीच सांगता

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २२ डिसेंबर, २०१२ | शनिवार, डिसेंबर २२, २०१२

येवला तालुका विज्ञान प्रदर्शनाची नुकतीच सांगता झाली. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या स्वयंचलित अग्निशमन यंत्रास प्रथम पारितोषिक विभागीय सहसचिव शिवनाथ मंडलिक यांच्या हस्ते देण्यात आले . दुसऱ्या गटात चेतन दंडगव्हाळ याने सौर सायकल हे उपकरण बनवेले त्यालाही प्रथम पारितोषिक विभागीय सहसचिव शिवनाथ मंडलिक यांच्या हस्ते देण्यात आले. अंबादास सालमुठे या स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या शिक्षकाने सादर केलेल्या व्यवसाय मार्गदर्शन प्रकल्पालाही प्रथम पारितोषिक पंस सदस्या  सौ.शिवांगी वसंत पवार यांच्या हस्ते देणेत आले. बेटी बचाव प्रकल्पालाही सन्मानित करणेत आले. सदर प्रंसगी अर्जुन कोकाटे सर, विलास रंधे, भास्कर कोंढरे, रतन बोरणारे हरिभाऊ जगताप, प्रा.गुमानसिंग परदेशी,प्रा.संजय वाबळे गटशिक्षण विस्तार अधिकारी संजय कुसाळकर उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity