ताज्या घडामोडी :
Home » » अतिक्रमण हटाव मोहिम....न्यायालयातून स्थगिती आदेश ...............

अतिक्रमण हटाव मोहिम....न्यायालयातून स्थगिती आदेश ...............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २२ डिसेंबर, २०१२ | शनिवार, डिसेंबर २२, २०१२

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सव्र्हे क्र. 3907 व 3908 या भुखंडावरील 80बेकायदेशीर बांधकामे आज पालिकेने जमिनदोस्त केली. उर्वरीत सहा जणांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळविल्याने त्यांची बांधकामे तशीच ठेवण्यात आली आहे. कै. नारायणराव पवार व कै. गोविंदनाना सोनवणे या दोन पतसंस्थांना आज निफाड सत्र न्यायालयाने 4 जाने 2013 पर्यंत बांधकाम न पाडण्याचा आदेश दिला आहे. तसेच शिंदे, यांनीही निफाड न्यायालयातून स्थगिती आदेश मिळविला. नागपूरे आणि कापसे यांनी येवला न्यायालयातून तर प्रणव गुजराथी व विजय लोणारी यांनी स्थगिती आदेश प्राप्त केला आहे. विजय लोणारी यांनी सन 2001 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याने निकाल लागेपर्यंत सदरची सर्व बांधकामे तशीच ठेवण्यात येणार आहे. हटविण्यात आलेल्या बांधकामापैकी 96 गाळ्यांचे पंचनामे आज झाले, उर्वरीत 5 गाळ्यांचे पंचनामे बाकी असून ते उद्या होतील. सात बांधकामांना न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याने एकूण 108 पैकी 101 बेकायदेशीर बांधकामे पालिकेने बांधकामे पालिकेने उद्ध्वस्त केली असल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सांगितले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity