ताज्या घडामोडी :
Home » » अंगणगाव शिवारातील चार्‍याच्या सुडय़ांना आग ... सुडय़ा खाक झाल्या

अंगणगाव शिवारातील चार्‍याच्या सुडय़ांना आग ... सुडय़ा खाक झाल्या

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२ | शुक्रवार, डिसेंबर १४, २०१२


अंगणगाव शिवारातील एका शेतातील चार्‍याच्या सुडय़ांना अचानक आग लागून सुडय़ा खाक झाल्या असून, लोखंडी ट्रॅक्टर ट्रॉलीचेही नुकसान झाले. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंगणगाव शिवारातील गावठाणात असणार्‍या शेतातील चार्‍याच्या सुडय़ांना दुपारी आग लागली. आग इतकी प्रचंड होती की, या आगीत शेतातील चारा, ट्रॅक्टर ट्रॉली, पाईप, शेती अवजारे जळून खाक झाले. यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सोपान गायकवाड, देवराम गायकवाड, नंदू गायकवाड,अप्पासाहेब गायकवाड यांच्या मालकीची शेती औजारे व चार्‍यांचे जळीतात नुकसान झाले. आग विझविण्यासाठी येवला व मनमाड पालिकेचे अगिAशामक बंब बोलाविण्यात आले होते. नायब तहसीलदार विनायक थविल, पो. नि. श्रवण सोनवणे, स.पो.नि. पांडुरंग खेडकर, तलाठी पांडुरंग केबारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन जळीत प्रकरणाची पाहणी केली. तलाठय़ांनी पंचनामा केला असून, शहर पोलीस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity