ताज्या घडामोडी :
Home » » नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना अँड.माणिकराव शिंदे

नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना अँड.माणिकराव शिंदे

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १५ डिसेंबर, २०१२ | शनिवार, डिसेंबर १५, २०१२



येवल्याचे नगराध्यक्ष नीलेशभाई पटेल यांचा 12-12-12 चा अनोखा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या विशेष दिली ग्रामीण रुग्णालयात जन्म घेतलेल्या चार बालकांच्या शिक्षणाची पूर्णपणे जबाबदारी स्वत: नीलेशभाईंनी घेतल्याने बालकांच्या मातांनी समाधान व्यक्त केले.

12 तारखेला ना. शरदचंद्र पवार, खा. गोपीनाथ मुंडे व नगराध्यक्ष नीलेशभाई पटेल यांचा अनोखा वाढदिवस सर्वच ठिकाणी साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या दिनी येथील ग्रामीण रुग्णालयात 11 तारखेला रात्री 12 वाजुन 12 मिनीटांनी परवीन युनुस पठाण (रा. येवला) या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला, तसेच रात्री 12.20 वाजता अफसाना अहमद अन्सारी (रा. मिल्लतनगर, येवला) पहाटे 5.55 ला ज्योती बाळासाहेब राजुळे (रा. ताजपार्क, येवला) व सकाळी 7.5 वा. भारती दादासाहेब उकिरडे (रा. कोळम, ता. येवला) या महिलांनी मुलाला जन्म दिला. प्रसुत झालेल्या महिलांच्या घरची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यांचे पती मोलमजुरी करीत असल्याने नगराध्यक्ष नीलेशभाईंनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity