ताज्या घडामोडी :
Home » » आठ टवाळखोरांवर शहर पोलिसांची कारवाई

आठ टवाळखोरांवर शहर पोलिसांची कारवाई

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२ | शुक्रवार, डिसेंबर २८, २०१२

  येवला,शहरातील बसस्थानक, जनता व मुक्तानंद विद्यालय परिसरात, सार्वजनिक ठिकाणी महिलांना व मुलींना दिसेल अशा पद्धतीने जाणून बुजून गैरवर्तन करताना आढळून आलेल्या आठ टवाळखोरांवर शहर पोलिसांची कारवाई केली आहे.

मुजमील आयुब सौदागर (वय 19, रा. मुलतानपुरा), अक्षय बाळासाहेब लभडे (रा. टेलिफोन कॉलनी), जितेंद्र उमेदसिंग राजपुरोहित (वय 18, रा. श्रीराम कॉलनी), आकाश गोपीनाथ पांगुळ (वय 19 रा. सप्तशृंगी मंदिराजवळ, सर्व रा. येवला), राहुल अशोक गायकवाड (वय 20), महेश सुधाकर गायकवाड (वय 27, रा. धुळगाव, ता. येवला), ज्ञानेश्वर श्रावण बर्डे (वय 18, रा. थडी सारोळे, ता. निफाड), किरण विक्रम मोरे (वय 22, रा. कोंडार (ता. नांदगाव) आदी आठ युवक सार्वजनिक ठिकाणच्या परिसरात टवाळखोरी करताना आढळून आल्याने त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता वैयक्तिक जाचमुचल्यावर न्यायालयाने सोडून दिले.

दोन जामिनदारांसह 1 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे, तर पुरोहित याने गुन्हा कबूल केल्याने त्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलीस उपअधीक्षक समाधान पवार यांच्या आदेशान्वये पो. नि. श्रावण सोनवणे, पांडुरंग खेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील युवतीवर अत्याचार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई एस.एन. डी. बाभुळगाव परिसरात विभत्स वर्तन करताना आढळून आल्यास केली जाईल, असे पोलीसांनी सांगितले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity