ताज्या घडामोडी :
Home » » अतिक्रमित गाळेधारकांनी साहित्य हलविण्यास केली सुरुवात

अतिक्रमित गाळेधारकांनी साहित्य हलविण्यास केली सुरुवात

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २० डिसेंबर, २०१२ | गुरुवार, डिसेंबर २०, २०१२

 

येवला शहरातील सर्व्हे क्रमांक ३९०७ व ३९०८ मधील अतिक्रमित गाळेधारक, व्यावसायिकांनी मंगळवारी रात्रीपासून आपापल्या गाळ्यांमधील साहित्य हलविण्यास सुरुवात केली. सुमारे ९० गाळेधारकांची अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांनी येथील साहित्य मिळेल त्या वाहनाने इतरत्र आज मोठ्या प्रमाणावर हलविले. व्यावसायिकांची साहित्य हलविताना चांगलीच दमछाक होताना दिसून आली. शहरातील मुख्य बाजारपेठेत या व्यावसायिकांचे गाळे असल्याने मोठ्या प्रमाणावर साहित्य दुकानांमध्ये आहे. पर्यायी जागाही येथील व्यावसायिकांना उपलब्ध न झाल्याने व्यावसायिकांना साहित्य कुठे हलवावे हा प्रश्‍नही पडला. अतिक्रमित जागेत गणेश चाळ ही सर्वांत जुनी असून सन १९७० मध्ये ठरावाद्वारे पालिकेने व्यापार्‍यांना येथे व्यवसायासाठी जागा दिल्या होत्या.  


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity