ताज्या घडामोडी :

.

.
Home » » पालखेड कालव्याचे पाणी पिण्यासाठी मिळावे शेतकर्‍यांची मागणी

पालखेड कालव्याचे पाणी पिण्यासाठी मिळावे शेतकर्‍यांची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ५ डिसेंबर, २०१२ | बुधवार, डिसेंबर ०५, २०१२

पालखेड डावा कालव्याचे पाणी पिण्यासाठी मिळावे, अशी मागणी शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळांकडे केली असता भुजबळ यांनी आज दुपारी ४ वाजता पालखेड विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुर देसाई, प्रांत सरिता नरके, तहसीलदार हरीश सोनार यांच्या समवेत तातडीची बैठक लावली. बैठकीला तालुक्यातील पाणी वापर सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे, सुरेश कदम यांनी पालखेड डावा कालव्यांतर्गत तालुक्यातील वितरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, जनावरांसाठी चारा तयार करता येईल यासाठी आवर्तन द्यावे अशी मागणी केली.
करंजवण धरणात या वर्षी ३२००, पालखेड धरणात ७५० दशलक्ष घनफूट तर वाघाडमधून ४० टक्क्यांप्रमाणे मिळणारे १ हजार असे सिंचन व बिगरसिंचनासाठी मिळणारे एकूण पाणी १५ ऑक्टोबरपर्यंत ४ हजार ९५० दशलक्ष घनफूट इतके आहे अशी माहिती संतू पाटील झांबरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली. मागील वर्षी बिगर सिंचनासाठी जुलै २०१२ पर्यंत २१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले होते. या वर्षी जिल्ह्यातून पाण्याची मागणी अधिक गृहीत धरता ३५०० दशलक्ष घनफुटापर्यंत पाणी आरक्षित केल्यावरही १५०० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा सिंचनासाठी देता येऊ शकतो, असेही झांबरे यांनी कार्यकारी अभियंता अंकुर देसाई यांच्या समक्ष भुजबळांना सांगितले.
तालुक्यात पिकांची परिस्थिती बिकट आहे. रब्बीचा हंगाम निघेल अशी शाश्‍वती नाही, त्यामुळे पिण्यासाठी व जनावरांच्या चार्‍यासाठी एकतरी आवर्तन द्यावे या पाणी वापर सहकारी संस्थांच्या आग्रही मागणीवर भुजबळांनी कार्यकारी अभियंता देसाई यांना आरक्षित पाण्यासह उर्वरित पाणी साठ्यावर फेरआढावा घेऊन तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी बाजार समिती संचालक शरद लहरे, प्रभाकर बोरनारे, मल्हारी दराडे, सुभाष सोनवणे, रावसाहेब पवार, भागवत खराटे, दत्तात्रय गायकवाड, उल्हास गायकवाड, सुभाष गायकवाड, साहेबराव दौंडे, सतीश पाटील, मकरंद सोनवणे, राधाकिसन सोनवणे आदी उपस्थित होते. शासकीय अधिकार्‍यांसमवेतही भुजबळांनी दुपारी बैठक घेऊन शासकीय कामकाजांचा आढावा घेतला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity