ताज्या घडामोडी :
Home » » तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ

तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा...पालकमंत्री छगन भुजबळ

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२ | गुरुवार, डिसेंबर ०६, २०१२

जनतेने तुम्हाला शहर विकासाची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यापुढे गैरहजर राहता कामा नये, सर्वांनी संघटित होऊन जनतेची कामे करा, वेळ देता येत नसेल तर नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्या, अशी तंबीच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नगरसेवकांच्या बैठकीत दिली.
येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीसह कॉंग्रेस व अपक्ष नगरसेवकांची बैठक छगन भुजबळ यांनी बोलावली होती. बैठकीला ज्येष्ठ नगरसेविका उषाताई शिंदे व अपक्ष नगरसेविका अयोध्या शर्मा गैरहजर होत्या. तर राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिरीन शेख व शबाना बानो शेख यांच्याऐवजी त्यांचे पतीमहाशय बैठकीला हजर होते. हे बघून भुजबळांनी नगरसेवक बैठकांना गैरहजर का राहतात, असा सवाल पालिका गटनेते प्रदीप सोनवणे यांना केला. बैठकीत नगरसेवक पंकज पारख यांनी मागील वेळेस बाजार समितीवर पालिकेचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक व विद्यमान नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या ठरावाला विरोध झाला होता याची आठवण भुजबळांना करून देताना त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीच उपस्थिती कमी होती हे निदर्शनास आणून दिले. यावर बहुमत असतानाही ठरावाला विरोध होतो हे खेदजनक असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. पालिकेत सर्वसाधारण सभांना सह्या करून राष्ट्रवादीचे नगरसेवक सभांना उपस्थित न राहता निघून जाणे पसंत करत असतील तर तुमचीही हाजी-हाजी करणे मला यापुढे जमणार नाही, यापेक्षा जनतेची हाजी-हाजी करणे मी पसंत करेन, असे संतप्तपणे भुजबळ यावेळी म्हणाले. बैठकीला नगराध्यक्ष नीलेश पटेल, उपाध्यक्षा भारती जगताप, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक पंकज पारख, हुसेन शेख, रवी जगताप, पालिका गटनेते प्रदीप सोनवणे, मनोहर जावळे, मुस्ताक शेख, संजय कासार, नगरसेविका राजश्री पहिलवान, जयश्री लोणारी, सरला निकम, पद्मा शिंदे, नीता परदेशी भारती येवले आदी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity