ताज्या घडामोडी :
Home » » प्रा. दिनकर दाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

प्रा. दिनकर दाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२ | गुरुवार, डिसेंबर ०६, २०१२

समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार समता प्रतिष्ठान संचलीत समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव रास्ता येथील मुख्याध्यापक दिनकर दाणे यांना प्राचार्य नलिनीताई वैद्य समाजभिमुख शिक्षक पुरस्कार साने गुरुजी स्मारक पुणे येथे प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह, शाल आणि प्रमाणपत्र देऊन दाणे यांना गौरविण्यात आले. राष्ट्रसेवादल कार्यकारी विश्वस्त अभिजित वैद्य, राष्ट्रीय समन्वयक सोशालिस्ट महिला सभा वर्षा गुप्ते, राष्ट्रसेवादलचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंक कपोले, केंद्रीय आरोग्य सेवा समिती सदस्य डॉ. गितांजली वैद्य, माजी गृहराज्यमंत्री डॉ. भाई वैद्य, राष्ट्रसेवादल विश्वस्त सुरेश देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, सुधाताई पाटील, पंडीत मढवई, बाबासाहेब कोकाटे, रामनाथ पाटील, कानीफनाथ मढवई, सलिल पाटील, हरिश्चंद्र सोनवणे, भाऊसाहेब मगर आदींनी अभिनंदन केले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity