ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यात आजपासून राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन

येवल्यात आजपासून राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १२ जानेवारी, २०१३ | शनिवार, जानेवारी १२, २०१३

येवला, दि. 11  - भारत सरकारच्या युवा कार्यक्रमांतर्गत क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी व येथील स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंचतर्फे दि. 12 ते 19 जानेवारी 2013 दरम्यान राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवादिन व स्वामी विवेकानंद यांची 150 वी जयंती, युवा सप्ताहाचे उद्घाटन तहसीलदार हरीष सोनार, नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दि. 13 रोजी सांस्कृतिक दिनानिमित्त प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद चित्र रंगभरण स्पर्धा, दि. 14 रोजी समाजसेवादिनानिमित्त गोशाळा मैदानावरील गोरगरिबांना तीळगूळ व वस्त्रदान वाटप, 16 जानेवारी रोजी शारिरीक क्षमता तथा साहस दिनानिमित्त हळदी कुंकू व तीळगूळ वाटप कार्यक्रम, तसेच महिला संगठन मेळावा व मार्गदर्शन सांयकाळी 6 वाजता नामदेव विठ्ठल मंदिरात, दि. 17 जानेवारी रोजी शांततादिनानिमित्त शांतता संदेश जनजागृती रॅली, मल्लखांब स्पर्धा, दि. 18 रोजी कला कौशल्य विकासदिनानिमित्त स्लो सायकल, मॅरेथॉन, उंचउडी, तसेच रांगोळी, निबंध स्पर्धाचे आयोजन, तसेच दि. 19 रोजी जागृतीदिन व युवा सप्ताहाचा समारोप होणार आहे.

स्पध्रेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पध्रेत सहभागी होण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक भास्कर कोल्हे, खटपट युवा मंचचे अध्यक्ष मुकेश लचके, कार्यवाह प्रा. दत्ता नागडेकर यांनी केले आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity