ताज्या घडामोडी :
Home » » झी २४ तासचे चेतन कोळस यांचा सत्कार..............

झी २४ तासचे चेतन कोळस यांचा सत्कार..............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १३ जानेवारी, २०१३ | रविवार, जानेवारी १३, २०१३

येवला-  येवल्यातील श्री.चेतन कोळस यांना नाशिक जिल्हा पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देणेत आला. त्याबद्दल त्यांचे नगराध्यक्ष निलेश पटेल मुख्याधिकारी डॉ.मेनकर यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. तसेच येवला शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक श्रावण सोनवणे यांनीही त्यांचा सत्कार केला . चेतन कोळस हे झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असून त्यांनी आपल्या कॅमेऱ्याने अनेक समस्या मांडलेल्या आहेत. अल्प वयातच त्यांना पत्रकारितेतील मानाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. येवलान्यूज.कॉमला त्यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity