ताज्या घडामोडी :
Home » » येवल्यानजीक अपघातात वैजापूरचे दोघे ठार

येवल्यानजीक अपघातात वैजापूरचे दोघे ठार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २१ जानेवारी, २०१३ | सोमवार, जानेवारी २१, २०१३

येवला - अंदरसूल येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर एसटी बस व दुचाकी अपघातात वैजापूर तालुक्यातील दोघेजण ठार झाले आहेत. त्र्यंबकेश्‍वरहून लोणारकडे जाणारी एसटीबस (क्रमांक एमएच४0एन८७१४) येवल्याकडे येणारी हिरो होंडा दुचाकी (क्रमांक एमएच २0 बीबी ३७५९) यांच्यात अंदरसूल येथील वळणावर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार साजिद शेख (२0) रा. बाभूळगाव बुद्रुक, ता. वैजापूर हे दोघे ठार झाले.
सदर घटना आज सकाळी ११.३0 वा. घडली. दोघे दुचाकीस्वार येवला येथे एका विवाहसमारंभासाठी येत होते. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity