ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला-वैजापूर रोडवर इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

येवला-वैजापूर रोडवर इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३ | शुक्रवार, जानेवारी २५, २०१३

येवला - येवला-वैजापूर रोडवर काले पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास इनोव्हा कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.
येवला-वैजापूर रोडवर अंदरसूलजवळील काले पेट्रोल पंपावरून माधवराव गवनाजी साप्त (वय 65, रा. अंदरसूल, ता. येवला) हे आपल्या मोटारसायकल(क्र. एमएच 15 सीएन 7279) मध्ये पेट्रोल भरून बाहेर रोडवर येत असताना येवला बाजूकडून वैजापूरकडे जाणारी इनोव्हा कारने (क्र.एमएच 04 डीई 5663) मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील माधवराव साप्ते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अधिक तपास पो.उ.नि. आर. के. माळी, हवालदार ठोंबरे करीत आहेत. आठवडाभरात मोटरसायकलच्या झालेल्या विविध अपघातात नऊ जण ठार झाले आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity