ताज्या घडामोडी :
Home » » धुळगाव परिसरातील अवैध दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी

धुळगाव परिसरातील अवैध दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २३ जानेवारी, २०१३ | बुधवार, जानेवारी २३, २०१३

येवला तालुक्यातील धुळगाव परिसरात सर्रासपणे अवैध दारूचे अड्डे असून, विक्री तेजीत सुरू आहे. हे अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी येवला ग्रामीण पोलीस स्टेशनला तीन महिन्यांपूर्वी करीत अर्ज दिला आहे; मात्र धंदे बंद होत नसल्याची खंत भारतीय बहुजन सेनेचे धुळगाव गणप्रमुख शशिकांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. जे नशेमध्ये गैरकृत्यही करण्यास घाबरत नाही यांना वेळीच मुसक्या घालाव्यात, अशी मागणी जगताप यांनी केली असून, वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित अवैध धंदे त्वरित बंद करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असेही जगताप यांनी म्हटले आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity