ताज्या घडामोडी :
Home » » येवला तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे

येवला तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २१ जानेवारी, २०१३ | सोमवार, जानेवारी २१, २०१३

येवला-  नाशिक जिल्ह्यात प्रथम आय.एस.ओ. मानांकन मिळविलेल्या येवला येथील तहसील कार्यालयात आता, सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तहसील कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी येवला तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
सेतू विभागात आतील भागात १ व बाहेरील बाजूस १ तसेच निवासी नायब तहसीलदारांच्या डस्कसमोर तर सेतू प्रवेशद्वाराजवळ एक असे ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, या चारही कॅमेर्‍यांचे एकत्रित चित्रण तहसीलदार कक्षात व सेतू व्यवस्थापन कक्षात दिसते अशी व्यवस्था करण्यात आली आहे. येवला तहसील कार्यालय व सेतू विभागाबाबत नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता पारदर्शकतेबरोबरच गतिमान कामकाजासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यामुळे दिरंगाई, गैरप्रकार व गैरसमजही दूर होतील, असे तहसीलदार हरिश सोनार यांनी सांगितले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity