ताज्या घडामोडी :

.

.
Home » » नगरसूल येथे रेल्वेगेटजवळ अपघात दोन ठारं

नगरसूल येथे रेल्वेगेटजवळ अपघात दोन ठारं

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २० जानेवारी, २०१३ | रविवार, जानेवारी २०, २०१३

नगरसूल- येवला- नांदगाव महामार्गावर नगरसूल रेल्वे गेटजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. नगरसूल रेल्वे गेट बंद असल्याने याठिकाणी ट्रक (एमएच १५ बी-१७३) उभा होता. पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या बजाज फोर एस दुचाकीने (एम. एच. १५ -१७६२)ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल
वरील हरी वसंत आव्हाड (४५) व पांडू संपत चकोर (२५) हे दोघेही जागीच ठार झाले. ते निफाड तालुक्यातील खामगावतळी येथील रहिवाशी होते. याप्रकरणी येवला पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity