ताज्या घडामोडी :
Home » » चिचोंडी सरपंचाविरुद्ध अविश्‍वास मंजूर

चिचोंडी सरपंचाविरुद्ध अविश्‍वास मंजूर

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३ | मंगळवार, फेब्रुवारी १२, २०१३

येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. चंद्रकला मढवई यांच्या विरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर झाला. तहसीलदार हरिष सोनार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा संपन्न झाली. सभेत सरपंच सौ. मढवई यांच्या विरोधात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने आठ पैकी सहा सदस्यांनी मत नोंदविले. बहुमताने अविश्‍वास ठराव मंजूर झाला. सभेस सारिका कासलीवाल वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. सरपंच सौ. मढवई ग्रामपंचायत कारभार करताना सदस्यांना विश्‍वासात घेत नाही व विकासकामात अडथळा आणतात म्हणून सदस्यांनी अविश्‍वास ठराव आणला होता.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity