ताज्या घडामोडी :
Home » » येवल्यातील भूमिगत गटार योजनेस मंजुरी

येवल्यातील भूमिगत गटार योजनेस मंजुरी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३ | गुरुवार, फेब्रुवारी २८, २०१३

येवला- येवला शहराकरिता केंद्र शासनपुरस्कृत यूआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचा प्रस्तावास जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. नगरपालिकेने भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सन २00८ मध्ये जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीकरिता सादर केला होता. ४0.0 कोटी रुपये खर्चाच्या सदर प्रस्तावास १४ जानेवारी रोजी मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मंजुरी दिली होती. १६ व्या राज्यस्तरीय मंजूर समितीमध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यावेळी सुधारित प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली गेली. सुधारित प्रस्ताव पुन्हा तांत्रिक मंजुरीकरिता जीवन प्राधिकरणाकडे सादर केला असता २0 फेब्रुवारी रोजी ४२.१0 कोटी रुपये खर्चाच्या सदर सुधारित प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली. पालिका सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity