ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला तालुक्यातील बंधारे भरून द्या.....संतू पाटील झांबरे

येवला तालुक्यातील बंधारे भरून द्या.....संतू पाटील झांबरे

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१३ | गुरुवार, फेब्रुवारी ०७, २०१३

येवला -तालुक्यातील ग्रामीण भागात टंचाई आराखडय़ातील गावांमधील पिण्याच्या पाण्यासाठीचे बंधारे त्वरित रोटेशन देऊन भरून द्यावे व शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बळीराज्य पाणी वापर संस्थांच्या सहकारी संघाचे चेअरमन संतू पा. झांबरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले की, यावर्षी गोदावरी प्रकल्पातील दि. 15 ऑक्टोबर 2012 रोजी उपलब्ध पाणीसाठा 5 हजार दलघफूट आहे. त्यातील पिण्यासाठी पाणी आरक्षण 3500 दलघफू केले आहे व 280 दलघफू पालखेड उजव्या कालव्यासाठी सिंचनाला ठेवले आहे; मात्र पालखेड डाव्या कालव्यासाठी संपूर्ण पाणी वापर सहकारी संस्थांना पाणी नाकारण्यात आले. कारण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात आरक्षण केले.

यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी येवल्यासाठी 720 दलघफू आरक्षित केले. मागील वर्षी येवल्यासाठी फक्त 300 दलघफू आरक्षित होते. मनमाडसाठी यावर्षी 575 दलघफू केले आहे. मागील वर्षी मनमाडसाठी 325 दलघफू होते. याचप्रमाणे विंचूर, लासलगाव, मनमाड, मनमाड रेल्वे व प्रासंगिक आरक्षण मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेले आहे. पिण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आरक्षण करूनही येवल्यासाठी 6 दिवसाआड व मनमाडसाठी 20 ते 25 दिवसांनी पिण्यासाठी नागरिकांना पाणी मिळत आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity