ताज्या घडामोडी :

.

.
Home » » एप्रिलअखेरच पालखेडचे आवर्तन - भुजबळ

एप्रिलअखेरच पालखेडचे आवर्तन - भुजबळ

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ४ मार्च, २०१३ | सोमवार, मार्च ०४, २०१३

येवला- येसगाव पाणी योजनेसाठी शासनाने २५ कोटी मंजूर केले ते मनमाडमधील टंचाईमुळे. ती येवल्यासाठीच मिळाली नसती. त्यामुळे होतयं, होऊ द्या. हे पाणी प्यायला मिळाले, तर पालखेडचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येईल, असे स्पष्ट करतानाच पाणी जपून वापरण्याचा कानमंत्र देत येवला व मनमाडसाठी आता एप्रिलअखेर आवर्तन मिळणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथील आढावा बैठकप्रसंगी जाहीर केले.

येथील शासकीय विश्रामगृहावर दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे धनंजय कुलकर्णी यांनी येसगाव योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता भुजबळांनी वरील स्पष्टीकरण दिले. जिल्हाधिकारी विलास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार, आमदार जयंत जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, नरेंद्र दराडे, नगराध्यक्ष नीलेश पटेल आदींसह अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार हरीष सोनार यांनी दुष्काळी स्थितीचा आढावा सादर केला. ३८ गाव योजनेला दहा गावे जोडली, तरी चालेल, अशी सूचना व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर यांनी मांडली. भुजबळांनी काय करता येईल, अशी विचारणा करताच नंदनवार यांनी वाड्यावस्त्या जोडणार असल्याचे सांगितले. दरसवाडीच्या कामासाठी रेल्वे व रस्ता परवानगीचे काय, असा प्रश्न कृती समितीचे संजय पगारे यांनी उपस्थित करताच भुजबळांनी लागलीच होकार दर्शविला.

यावेळी चर्चेत पंचायत समितीचे सदस्य संभाजी पवार, वसंत पवार, सचिन कळमकर, भास्कर कोठरे, सोमासे, संजय पगारे, यादवराव देशमुख, अशोक संकलेचा, प्रमोद सस्कर, प्रकाश वाघ, राधाकिसन सोनवणे, वाल्मीक गोरे आदींसह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुर देसाई, उपअभियंता क्षीरसागर, कृषी अधिकारी अशोक कुळधर, महावितरणचे अधीक्षक अभियंता किशोर परदेशी, उपअभियंता गणेश रिचवाल आदींनी सहभाग घेतला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity