ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयीताच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय मोर्चा

येवल्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयीताच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय मोर्चा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १२ मार्च, २०१३ | मंगळवार, मार्च १२, २०१३

येवला - आज देशभरात बलात्काराच्या आरोपीविरुध्द वातावरण असताना येवला तालुक्यात मात्र वेगळेच वातावरण आहे.
नगरसूल येथील शिक्षक व येवला तालुका कॉग्रेसचे पदाधिकारी यांना राजकिय हेतूने बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटकवण्यात आले असून त्याविरोधात येवला येथील सर्वपक्षीय समितीने मोर्चा काढणार असल्याचे पत्रक प्रकाशित केलेले आहे. गेल्या दिड महिन्यापासुन आरोपी प्रमोद पाटील हे फरार आहेत. सदर बलात्काराची फिर्याद ही राजकिय वैमनस्यातून दाखल केलेली आहे असे ह्या समितीचे म्हणणे आहे सदर पत्रकात नगरसूल गावातील राजकिय वैमनस्यातून प्रतिष्ठित राजकिय नेत्यांवर व त्यांच्या कुटुंबीयावर खोटे गुन्हे दाखल करून चारित्र्य हनन करण्यासाठी तसेच राजकिय जीवनातून संपवून टाकण्यासाठी जे अनिष्ट व विकृत प्रकार राजकिय दबावाने सुरु आहे, अशा अपप्रवृत्तींच्या विरोधात लोकशाही मार्गाने भव्य सर्वपक्षीय निषेध मुक मोर्चाचे आयोजन असल्याचे नमुद केलेले आहे. तसेच निरपराध राजकिय , सामाजिक व तळागाळातील जनतेची सेवा करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यावर सत्तेचा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन अन्याय होऊ नये याकडे लक्ष वेधण्यासाठी व राजकिय दबाव तंत्राचा विरोध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन असल्याचे नमुद आहे. सदर मोर्चा हा दि १३ मार्च रोजी विंचुर चौफुलीवरील डॉ.आंबेडकर पुतळा , मेनरोड कापडबाजार मार्गे टिळक मैदान मार्गे जाणार आहे. सर्वपक्षीय मोर्चा काढण्यासंदर्भात काल रविवारी नगरसूल येथे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा बँक संचालक ऍड. माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, पंचायत समिती सदस्य संभाजी पवार, शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भाजपचे धनंजय कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष मनोद दिवटे, मनसे शहराध्यक्ष गौरव कांबळे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गायकवाड, शहराध्यक्ष राजेश भंडारी, छावाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय सोमासे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण आहेर, नगरसेवक मनोहर जावळे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष निकम, राजेंद्र पैठणकर, रिपाइं युथचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, दिनेश आव्हाड आदी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity