ताज्या घडामोडी :

.

.
Home » » अंदरसूल अंगणवाडी कामाच्या चौकशीची मागणी

अंदरसूल अंगणवाडी कामाच्या चौकशीची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २० मार्च, २०१३ | बुधवार, मार्च २०, २०१३

 अंदरसूल गावातील अंगणवाडी क्रमांक सहाबाबतची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन व उपोषणचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा सेनेचे उपतालुकाप्रमुख झुंजार देशमुख यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले की, अंदरसूल गावातील अंगणवाडी क्र. ६ चे मंजूर झालेले काम प्रगतीपथावर असतानाच ठेकेदार व इंजिनिअर यांनी या कमाची पूर्ण रक्कम ३१ मार्च रोजीच काढली; मात्र काम अपूर्णावस्थेतच आहे. सदर कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा सेनेच्या वतीने आंदोलन, तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबू, असे म्हटले आहे. कारवाई न झाल्यास आपण फौजदारी गुन्हा दाखल करू, असे झुंजार देशमुख यांनी सांगितले. निवेदनावर झुंजार देशमुख, दीपक देशमुख, (छावा तालुकाप्रमुख), अभिजित देशमुख (युवा सेना) आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity