ताज्या घडामोडी :
Home » » शिवजयंती उत्सवानिमित्त येवल्यात कार्यक्रम

शिवजयंती उत्सवानिमित्त येवल्यात कार्यक्रम

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २६ मार्च, २०१३ | मंगळवार, मार्च २६, २०१३

येवला - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने येवले शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी व पदाधिकार्‍यांनी केले आहे. शनिवारी (दि.३0) सकाळी ६ वाजता o्री. व सौ. अमित अनकाईकर, o्री व सौ. राहुल लोणारी यांच्या हस्ते टिळक मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिषेक व पूजन केले जाईल. स. ८ वा. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. दि. ३ एप्रिल रोजी नाशिक जिल्हा सेना केसरी व युवासेना केसरी कुस्ती दंगल दुपारी ४ वाजता पारेगाव रस्त्यावरील भाऊ लाल पहिलवान क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. मिरवणुकीत सहभागी होणार्‍या प्रत्येक मंडळाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity