ताज्या घडामोडी :
Home » » चक्कर आल्याने एकाचा मृत्यू

चक्कर आल्याने एकाचा मृत्यू

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २७ मार्च, २०१३ | बुधवार, मार्च २७, २०१३

येवला - येथील बसस्थानकावर सावरगाव (ता. येवला) येथील मच्छिंद्र मारोतराव रौंदळ (वय ५५) यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ४ वाजता घडली. सावरगाव येथील मच्छिंद्र रौंदळ हे येवला येथे आठवडे बाजारासाठी आले होते. बसस्थानकाजवळील रिक्षा स्टॅण्डजवळ रौंदळ यांना फिट आली. त्यात ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ. जेजूरकर यांनी तपासणी केली असता मृत झाल्याचे घोषित केले. ऐन सणासुदीच्या दिवशी दु:खद घटना घडल्याने सावरगाव परिसरात शोककळा पसरली.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity