ताज्या घडामोडी :
Home » » राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजप्रश्नी आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजप्रश्नी आंदोलनाचा इशारा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १९ मार्च, २०१३ | मंगळवार, मार्च १९, २०१३

यवला तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजप्रश्नी पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येवला तहसीलदार हरिष सोनार यांना दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, शासकीय योजनांचा लाभ मिळविताना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याने बँकांच्या असहकार्यामुळे, दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. रेशनकार्ड, घरगुती गॅस यासाठी खाते उघडण्यास या बँकांकडून नकार दिला जातो. मंजूर प्रकरणे संबंधित कार्यालयास परत केली जात नाही, वैयक्तिक खाते उघडण्यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लावला जातो. याप्रकरणी तातडीने सर्व संबंधितांना सूचना करून कामकाजात सुधारणा न झाल्यास येत्या २८ मार्चपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity