ताज्या घडामोडी :
Home » » नगरसूल जवळ पिकअप ला अपघात १९ जखमी

नगरसूल जवळ पिकअप ला अपघात १९ जखमी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १२ मार्च, २०१३ | मंगळवार, मार्च १२, २०१३

येवला - नगरसूल जवळील वडाच्या मळ्याजवळ मंगळवारी दुपारी एका पिकअप जीपला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे पिकअप जीप पलटी झाली. त्यामधुन प्रवास करणारे १९ प्रवासी जखमी झाले आहे. त्यातील ६ गंभीर असल्याचे समजते. सदर प्रवासी हे मातुळठाण येथील म्हसोबाला बोकड कापण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. आदिवासी भिल्ल समाजातील भाविक असल्याचे समजते.  गंभीर जखमींना नाशिक सिव्हील हॉस्पिटल येथे हलवण्यात आले असून जखमीची विचारपूस बाळासाहेब लोखंडे व नगरसेवक रवि जगताप यांनी केली . या प्रकरणी येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला असुन तपास सुरु आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity