ताज्या घडामोडी :
Home » » विरोधासाठी विरोध करून सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणऱ्या मनसे व इतर विरोधकांचा रायगड ग्रुप कडून निषेध

विरोधासाठी विरोध करून सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणऱ्या मनसे व इतर विरोधकांचा रायगड ग्रुप कडून निषेध

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १० एप्रिल, २०१३ | बुधवार, एप्रिल १०, २०१३

येवला- असभ्य रितीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचा निषेध करणाऱ्या मनसे व इतर विरोधकाचा येवला तालुक्यातील रायगड ग्रुप ने धिक्कार केला आहे. तसे निवेदन रायगड ग्रुपचे संस्थापक माणिकराव शिंदे यांनी शेकडो रायगड ग्रुप च्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत तहसिलदार हरिष सोनार यांना दिले. या वेळी बोलताना माणिकराव शिंदे यांनी सांगीतले कि अजितदादांनी आपल्या बोलण्याबद्दल स्वतः जाहीर व विधीमडळातही माफी मागीतली आहे. तसेच मा.शरद पवार यांनीही माफी मागीतली आहे तरी सुध्दा विरोधक खालच्या पातळीवर जाऊन निषेध व्यक्त करीत आहे. यामुळे सभ्यतेच्या सर्व मर्यादा विरोधक विशेषतः मनसे ओलांडीत आहे . यावेळी खंडेराव जाधव , दामू पा.पवार,माणक शर्मा, रिझवान शेख,सुनिल काबरा,दत्तू दराडे,रंगनाथ भोरकडे,दत्तात्रेय वैद्य,लाला कुक्कर,सुदाम सोनवणे,राजेश कदम,संजय सोमासे , डॉ.संकेत शिंदे, शाहू शिंदे, प्रंशात आरखडे,भागीनाथ उशीर, ईश्वर पवार, सुनिल देशमुख,शाम शिंदे,अमोल शिंदे,अशपाक अन्सारी,प्रविण नेतकर इ सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity