ताज्या घडामोडी :

.

.
Home » » पाटोदा व अंदरसूल शिवारात आढळले दोन पुरुषांचे बेवारस मृतदेह

पाटोदा व अंदरसूल शिवारात आढळले दोन पुरुषांचे बेवारस मृतदेह

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ११ एप्रिल, २०१३ | गुरुवार, एप्रिल ११, २०१३

येवला - तालुका परिसरातील पाटोदा व अंदरसूल शिवारात पुरुषांचे दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

येवला पाटोदा रोडवर रिलायन्स टॉवरजवळ एक अंदाजे ५५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंगात चॉकलेटी रंगाची पॅन्ट, पांढर्‍या रंगाचा धारेचा मळकट शर्ट, डोक्याचे, दाढीचे केस वाढलेल्या अवस्थेत असे वर्णन आहे. याबाबतचा तपास हवालदार पेहेरकर करीत आहेत. येवला-वैजापूर रस्त्यावर अंदरसूल शिवारात नॅशनल कॉटन फायबर कंपनी समोर एका ७0 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. सफेद शर्ट व धोतर परिधान केलेला, रंगाने सावळा असा वृद्ध मृतावस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्याशी (0२५५९-२६५0७३) संपर्क साधावा .
     
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity