ताज्या घडामोडी :
Home » » गुढीपाडवा, मराठी नववर्षानिमित्त शहरातून स्वागत मिरवणूक

गुढीपाडवा, मराठी नववर्षानिमित्त शहरातून स्वागत मिरवणूक

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १४ एप्रिल, २०१३ | रविवार, एप्रिल १४, २०१३

येवला - गुढीपाडवा, मराठी नववर्षानिमित्त शहरातून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील श्री सुंदरराम मंदिर प्रांगणात गुढीपाडव्यानिमित्ताने श्रीराम कथा आनंद सोहळ्याचा दिमाखदार शुभारंभ झाला. शहरातून सकाळी ८ वाजता रथयात्रा काढण्यात आली. प. पू. चक्रांकित महाराज यांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेत अग्रभागी कलशधारी मुली सहभागी झाल्या होत्या. महिलांचे नऊवारी साडीतील लेझीम पथक खास आकर्षण ठरले होते. शोभायात्रेत शहरवासीय मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity