ताज्या घडामोडी :

.

.
Home » » राजापूरच्या यात्रेने घडविले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन भाविकांची गर्दी, तमाशा, कुस्तीचा फड, शोभेची दारूकाम लक्षवेधी

राजापूरच्या यात्रेने घडविले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन भाविकांची गर्दी, तमाशा, कुस्तीचा फड, शोभेची दारूकाम लक्षवेधी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १८ एप्रिल, २०१३ | गुरुवार, एप्रिल १८, २०१३


येवला -   हिंदु मुस्लिमांचे श्रध्दास्थान असलेल्या राजापूर येथील राजा मन्नाशाची यात्रा उत्साहात साजरी झाली. यात्रेच्या निमित्ताने पुन्हा हिंदु मुस्लिम यांच्यातील ऐक्याचे दर्शन घडले. यात्रेत झालेली कुस्त्यांची दंगल, शोभेची दारू लक्षवेधी व यात्रेची शोभा वाढविणारी ठरली.

नगर प्रांताचा प्रशासक असलेल्या राजा मन्नाशाची येथे वर्षानुवर्षे चैत्र शुध्द पंचमीला यात्रा भरते. याही वर्षी तीन दिवस यात्रा सुरु होती. पहिल्या दिवशी गावातून संदल मिरवणुक काढण्यात आली व कबरीवर संदल चढविण्यात आले. नवसुर्तीसह दर्शनासाठी गाव  व परिसरातील भाविंकाची दोन दिवस गर्दी सुरु होती. भाविकांनी मलिद्याचा प्रसाद चढविला, तसेच नवसही कबूल केले. यात्रेनिमित्त शोभेची दारू उडविण्याचा शुभारंभ युवानेते रुपेश दराडे यांच्या हस्ते करण्यात आला तर तमाशाचा प्रारंभ विठ्ठलराव मुंढे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

कुस्त्यांच्या दंगलीसाठी दोनशेच्या वर पहिलवान सहभागी झाले होते. यामुळे नजरेचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्यांचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला. औरंगाबाद, कोपरगांव, वैजापूर, चाळीसगांव, मनमाड,नांदगाव , पानेवाडी, कळवाडी मालेगांव , आहेरवाडी,ममदापूर आदी गांवासह दिल्लीच्या दोन पहिलवानांनी या कुस्त्यांच्या दंगलीत सहभाग घेतला.युवा नेते लक्ष्मण दराडे,अण्णा मुंढे, अश्पाक सय्यद यांच्या पुढाकारातून कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, सुहास कांदे, राजेंद्र लोणारी, दिनेश आव्हाड यांच्या हस्ते कुस्ती लावून कुस्त्यांना सुरुवात झाली. तीन तास चाललेल्या कुस्त्यामध्ये ७० हजार रुपयांचे बक्षिसवाटप पहिलवानांना करण्यात आले

यात्रा काळात भाविकांना दत्तू दराडे व प्रमोद बोडखे यांनी टँकरने पाणी पुरवठा केला होता. दर्शनासाठी बाहेरगांवी स्थायिक झालेले राजापूरवासिंयानी न चुकता यंदाही आपली हजेरी लावली. शिवाजी बोडखे, अश्पाक सय्यद, प्रमोद बोडखे, लक्ष्मण दराडे,हिरालाल अलगट, बबन बोडखे, भारत वाघ,गोरख दराडे, मस्जीदभाई सय्यद, विजय अलगट, पोपट आव्हाड, दत्ता सानप,डॉ.अविनाश विंचू, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी,रामभाऊ केदार, राधू कदम, लक्ष्मण घुगे,लहानु भाबड, एकनाथ वाघ,संपतराव अलगट आदींसह यात्रासमिती पदाधिकारी यांनी संयोजन केले.

" यात्रा साजरा करण्याचा ग्रामस्थांचा उत्साह व एकोपा निश्चीतच कौतुकास्पद आहे. गावाची एकजूट अनेकदा दिसलीही आहे. मोठ्या श्रध्देने गावकऱ्यांनी यात्रेचे आयोजन केले व आपला भक्तीभाव व्यक्त केला आहे" ---रुपेश दराडे , युवानेते , येवला
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity