ताज्या घडामोडी :
Home » » मैत्रीणीच्या सांगण्यावरून पैश्यांसाठी विवाहीतेचा छळ

मैत्रीणीच्या सांगण्यावरून पैश्यांसाठी विवाहीतेचा छळ

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ३ एप्रिल, २०१३ | बुधवार, एप्रिल ०३, २०१३

येवला  -  माहेरून व्यवसायासाठी पाच लाख रु. आणत नाही म्हणून छळ करीत असल्यामुळे विजया अनिल देशमुख रा. रुई ता.राहता जि. अ.नगर ह.मु. अंदरसूल या विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात पतीविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. तालुका पोलिसांनी भा.द.वि ४९८ (अ),३२३,५०४,५०६,३४ या प्रमाणे पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
    सौ . विजया देशमुख यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन वर्षांपासून ते ८ फेब्रूवारी २०१३ पर्यंत पती अनिल दत्तात्रय देशमुख रा. रुई ता. राहता यांचे त्यांच्या मैत्रीण ज्योती लोखंडे हीचेशी जास्त संबंध वाढल्याने घरात किरकोळ कारणावरून पती अनिल देशमुख आपणास मारहाण शिवीगाळ व दमदाटी करीत असे तसेच प्लॉटच्या व्यवसाय करणे कामी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये अशी सतत मागणी केली. सदर मागणी पुर्ण होत नाही म्हणून मैत्रीणीच्या सांगण्यावरून पती अनिलने माझ्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले व मला मुलांसह अंदरसूल येथे माहेरी आणुन सोडले. या प्रकरणी तालुका पोलिसांनी विवाहीतेचा छळ प्रकरणी गुन्हा दाखल केला असून . याबाबत अधिक तपास श्री.माळी करीत आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity