ताज्या घडामोडी :
Home » » स्वामी मुक्तानंद विद्यालातून मोटार सायकल गेली चोरीला,,,,,,,,,,,,,,,

स्वामी मुक्तानंद विद्यालातून मोटार सायकल गेली चोरीला,,,,,,,,,,,,,,,

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ६ एप्रिल, २०१३ | शनिवार, एप्रिल ०६, २०१३

येवला - मोटार सायकल चोरीच्या घटनेत सातत्य असून शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये मिटींग साठी आलेल्या अरुण रामदास पाटील या शिक्षकाची मोटार सायकल चोरीला गेली आहे. MH-15BQ 1222 या नंबरची बजाज डिस्कव्हर मॉडेलची मोटार सायकल मिटींगला आलेल्या पाटील या शिक्षकाने विद्यालयाच्या आवारात  उभी केली होती मिटींग संपल्यावर ३ वाजता आपली मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्याला आढळून आले. ही चोरी दुपारी ११ ते ३ च्या दरम्यान झाल्याचा संशय असून याबाबत येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो.ह. उंबरे याबाबत तपास करीत आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity