ताज्या घडामोडी :
Home » » येवला - ममदापूर बसला अपघात...........

येवला - ममदापूर बसला अपघात...........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ४ एप्रिल, २०१३ | गुरुवार, एप्रिल ०४, २०१३

येवला- येवला बस डेपोच्या येवला-ममदापूर या कोळगांव मार्गे जाणाऱ्या बसला एका मोटारसायकल स्वाराला चुकविण्याच्या नादात आज अपघात झाला. या बाबत सविस्तर वृत्त असे कि येवल्याहून ममदापूरला जाणारी बस कोळगावजवळ आली असताना समोरून भरघाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल स्वाराला चुकविताना बस शेजारील नालीत पलटी झाली. मोटर सायकल स्वार हा बसच्या टाकीला धडकला. त्यामुळे बसचे प्रवासी व वाहक व चालक किरकोळ जखमी झाले.पवार नावाचा चालक यात जखमी झाला आहे. बसमधील प्रवासी ममदापूर व कोळगाव येथील होते. याबाबत येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो.कॉ. आवारे तपास करीत आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity