ताज्या घडामोडी :

.

.
Home » » आठवड्यात ४ वाहने चोरीला तरी पोलिस प्रशासन सुस्त

आठवड्यात ४ वाहने चोरीला तरी पोलिस प्रशासन सुस्त

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ४ मे, २०१३ | शनिवार, मे ०४, २०१३

येवला-शहरात गेल्या आठवड्यात 4 चारचाकी वाहने चोरीला गेल्याने खळबळ
उडालेली आहे. आधीच दुष्काली परिस्थितीने गांजलेले येवलेकर वाहनचोरांच्या
सक्रियतेने हवालदिल झाले असून पोलिंसाकडून गाभिंर्याने पाऊले उचलली जात
नसल्याने नागरिंकामध्ये विशेषतः वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पालकमंत्र्याचा मतदारसंघातच चोरांची दहशत जनतेला अनुभवण्यास मिळत आहे.
पारेगाव रोडवरील शिंदेवस्तीवरून शॉर्ट बोलेरो गाडी ( एमएच
१७ ए जे ६०६६ ) दि.३० एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली
आहे. नेवासा येथील कंत्राटदार प्रसाद काळे यांची बोलेरो गाडी शिंदे
मळ्यात पार्किग केलेली असताना ती चोरी झाली. याबाबत येवला शहर पोलिसांनी
गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास पो.ह. उंबरे करीत आहे.
गंगादरवाजा भागात उभा असलेला प्रदिप साहेबराव शिंदे यांचा डंपर ट्रक
(एमएच ०६ ए क्यू ७१५१) ४ दिवसापुर्वी अज्ञात चोरट्याने रात्री चोरुन नेला
.याबाबत सहर पोलिसांनी शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून
पो.ह. शेख तपासकरीत आहे. तसेच शहरातील नागड दरवाजा भागातून मारुती झेन
चोरीला गेली आहे. याबाबत बिलाल शेख यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिलेला
आहे.
शहरातील मिल्लतनगर मधून इब्राहिम युनुस अन्सारी यांचा टेम्पो ४०७ एमएच
१८ – एम १७६२ काल मध्यरात्री ३ च्या सुमारास चोरी गेला आहे.
आधीच्या चोरीचा तपास दुर तर दिवसाआड नविन चोरीचे प्रकरण घडत आहे. मुख्य
म्हणजे गजबजलेल्या भागातूनच चोरी प्रकरण घडत आहे. शहरातून बाहेर जाणारे
रस्त्यांवर नाकाबंदी करणे गरजेचे झाले ्सून गस्तीपथकाची कार्यक्षमता
तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity