ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मेंढपाळावर सशस्र हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कडक कार्यवाही करण्याची मागणी

मेंढपाळावर सशस्र हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कडक कार्यवाही करण्याची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २१ जुलै, २०१३ | रविवार, जुलै २१, २०१३

येवला (अविनाश पाटील) - मेंढपाळावर सशस्र हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कडक
कार्यवाही करण्याची मागणी मल्हारसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील ममदापूर शिवारात परिसरातील मेंढपाळांचे वाडे अनेक
वर्षांपासून आहेत. वैजापूर तालुक्यातील पारळा येथील भिल्ल समाजातील काही
लोकानी या मेंढपाळाना हाकलून तेथे अतिक्रमण करून जमिनीवर वहीती करण्याचा
बेकायदेशीर प्रयत्न गेल्या तीन वर्षांपासून करत आहे. दि.१८ जुलै रोजी
दुपारी १२ वाजेच्या सुमारास १०० ते १५० समाजकंटकांनी ममदापूर शिवारातील
भावराव तांबे यांच्या वाड्यावर लाठ्या , काठ्या कुऱ्हाडीने सशस्र हल्ला
करून मेंढपाळ व त्यांची मुले महिला यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळ
असलेल्या मेंढ्याना जबर मारहाण केली त्यात पाच मेंढ्या मरण पावल्या आहेत.
दरवर्षी ही मंडळी मेंढपाळाना त्रास देत हल्ला करून ममदापूर शिवारात कायदा
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण करत आहे. तेव्हा पारळा येथील समाजकंटकावर
कडक कारवाई करुन कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी मल्हारसेनाप्रमुख लहुजी
शेवाळे यांनी केली आहे. प्रशासनाने वेळईच कार्यवाही केली नाही तर
मल्हारसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनात देण्यात
आला आहे. निवेदनावर एडव्होकेट शंतनु कांदळकर, बबन साळवे, दत्तू वैद्य,
राजेश शिंदे, भगवान कोळेकर, नामदेव भडांगे,समाधान तांबे, कचरू वनसे,
विलास वैद्य, तुकाराम करनर, बारकू शिंगाडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity