ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला येथील विंचूर चौफुलीवरील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोरील विहीरीत पडले वासरू

येवला येथील विंचूर चौफुलीवरील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोरील विहीरीत पडले वासरू

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २३ जुलै, २०१३ | मंगळवार, जुलै २३, २०१३

येवला- दि.23 (अविनाश पाटील) येथील विंचूर चौफुलीसमोरील डॉ.आंबेडकर
पुतळ्यासमोरील उघड्या विहीरीत आज दुपारी ५ च्या सुमारास एक दिड वर्षाचे
गोर्हे (गायीचे वासरू ) पडले. १ ते १.५ तासाच्या अथक प्रयत्नानंतर
स्थानिक नागरिंकानी सदरचे वासरास सुरक्षित बाहेर काढले. मधू पवार या
तरुणाने जीव धोक्यात घालून गाळाने भरलेल्या विहीरीत उतरून गायीला दोराने
व्यवस्थीत बांधले. बडा शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर वासरास जीवदान
दिले. नगरपालिकेचे कर्मचारी १ तासाने तिकडे फिरकले . नंतर अग्निशमन दलाची
गाडी आली आणि त्यांनी या प्रकरणाचा शेवट केला. यावेळी बघ्याची प्रंचड
गर्दी झाली होती. या वर्षीच्या दुष्काळात शहरातील अनेक विहीरीचा गाळ
काढला गेला त्यामध्ये याविहीरीचा ही गाळ काढला गेला पुर्वी असलेला स्लॅप
काढल्याने सदरची विहीरीला कोणतेही कठडे नव्हते. तात्पुरते अडसर म्हणून
चौफुलीवरील बॅरिकेटस लावलेले होते. दोन जनावरांच्या भांडणात हे वासरु या
विहीरीत पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.मुख्याधिकारी दिलीप मेनकर ,
अभियंता जनार्दन फुलारी अभियंता गवळी यांनी तेथे भेट घेतली .
मुख्याधिकारी यांनी पुन्हा विहीरीचे गाळ काढुन त्यावर स्लॅप टाकाण्याची
सुचना केली. यावेळी नगरसेवक प्रदिप सोनवणे हे ही उपस्थित
होते.नगरपालिकेने कोणतीही दुर्घटना होण्याच्या आत हे काम करावे तसेच तेथे
उभ्याअसलेल्या हातगाड्या बंद कराव्या अशी मागणी नागरिक करीत आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity